Skip to content
2 इतिहास १७:३-९

2 इतिहास १७:३-९

याहवेह यहोशाफाटबरोबर होते, कारण त्याने त्यांच्यासमोर त्याचा पिता दावीदाच्या मार्गाचे अनुसरण केले. त्याने बआल दैवतांचा सल्ला घेतला नाही.
परंतु इस्राएलच्या रीतिरिवाजा ऐवजी, त्याच्या पित्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले.
याहवेहनी त्याचे राज्य त्याच्या नियंत्रणाखाली स्थापन केले; आणि यहूदीयाच्या सर्व लोकांनी यहोशाफाटकडे भेटवस्तू आणल्या, त्यामुळे त्याला मोठी संपत्ती आणि सन्मान मिळाला.
त्याचे अंतःकरण याहवेहच्या मार्गाकडे समर्पित होते; याशिवाय, त्याने यहूदीयामधून उच्च स्थाने आणि अशेरा खांब काढून टाकले.
त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने त्याचे अधिकारी बेन-हेल, ओबद्याह, जखर्‍याह, नथानेल आणि मिखायाह यांना यहूदीयाच्या गावांमध्ये शिकविण्यासाठी पाठवले.
त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते.
त्यांनी त्यांच्याबरोबर याहवेहच्या नियमशास्त्राचे पुस्तक घेतले आणि संपूर्ण यहूदीयामध्ये शिकविले. त्यांनी यहूदीयाच्या सर्व शहरांत जाऊन लोकांना शिक्षण दिले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options