Skip to content
1 शमुवेल ४:३-४

1 शमुवेल ४:३-४

जेव्हा सैनिक छावणीकडे परत आले तेव्हा इस्राएलच्या वडीलजनांनी विचारले, “याहवेहने आज पलिष्ट्यांसमोर आमचा पराभव का होऊ दिला? आपण शिलोह येथून याहवेहच्या कराराचा कोश घेऊन येऊ, यासाठी की ते आपल्याबरोबर जाऊन आपल्या शत्रूच्या हातातून आपल्याला वाचवतील.”
म्हणून लोकांनी शिलोह येथे माणसे पाठविली आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांच्या मध्ये आरूढ आहेत, त्यांच्या कराराचा कोश परत आणला. आणि एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options