1 शमुवेल १२:८-११
८
याकोबाने इजिप्तमध्ये प्रवेश केल्यानंतर साहाय्यासाठी ते याहवेहकडे रडले आणि याहवेहने मोशे आणि अहरोन यांना पाठविले, त्यांनी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणले आणि त्यांना या ठिकाणी वसविले.
९
“परंतु याहवेह त्यांच्या परमेश्वरांना ते विसरले; म्हणून याहवेहने त्यांना हासोरचा सेनापती सिसेराच्या हाती आणि पलिष्ट्यांच्या हाती आणि मोआबच्या राजाच्या हाती विकून टाकले आणि ते त्यांच्याशी लढले.
१०
तेव्हा त्यांनी रडून याहवेहचा धावा करीत ते म्हणाले, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही याहवेहचा त्याग केला आहे आणि बआल व अष्टारोथ यांची सेवा केली आहे. परंतु आता आमच्या शत्रूंच्या हातातून आमची सुटका करा आणि आम्ही तुमची सेवा करू,’
११
तेव्हा याहवेहनी यरूब्बआल, बाराक, इफ्ताह आणि शमुवेल यांना पाठविले आणि त्यांनी सभोवतालच्या तुमच्या शत्रूपासून तुमची सुटका केली, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहिला.
Settings