1 शमुवेल १२:६-८
६
तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “ज्यांनी मोशे आणि अहरोन यांना नेमले, आणि तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले ते याहवेहच होते.
७
तर आता येथे उभे राहा, कारण याहवेहने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी केलेल्या सर्व नीतिमान कृत्यांविषयी मी तुम्हाला याहवेहसमोर बोध करतो.”
८
याकोबाने इजिप्तमध्ये प्रवेश केल्यानंतर साहाय्यासाठी ते याहवेहकडे रडले आणि याहवेहने मोशे आणि अहरोन यांना पाठविले, त्यांनी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणले आणि त्यांना या ठिकाणी वसविले.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings