Skip to content
1 राजे ८:४६-५०

1 राजे ८:४६-५०

४६
“जेव्हा ते आपणाविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून आपण त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून त्यांच्या जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले;
४७
आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’;
४८
आणि त्यांना कैद करून नेलेल्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने आपणाकडे वळले, आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर आपण निवडले आणि मी आपल्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील,
४९
तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा.
५०
आणि ज्या आपल्या लोकांनी आपणाविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करावी. त्यांनी आपणाविरुद्ध केलेल्या सर्व अपराधांची त्यांना क्षमा करा व त्यांना कैद करून नेणार्‍यांनी त्यांच्यावर दया दाखवावी असे आपण करावे;
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options