1 राजे ८:२९-३०
२९
‘माझे नाव या ठिकाणी राहेल’ असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी.
३०
आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंती करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या, व ती ऐकून त्यांना क्षमा करा.
Settings