1 राजे २०:१३-१४
१३
त्या दरम्यान इस्राएलचा राजा अहाबकडे एक संदेष्टा आला व त्याने असे जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘हे मोठे सैन्य तू पाहतोस काय? आज ते मी तुझ्या हाती देईन, मग तू जाणशील की मी याहवेह आहे.’ ”
१४
“परंतु हे कोण करेल?” अहाबाने विचारले. संदेष्ट्याने उत्तर दिले, “याहवेह असे म्हणतात: ‘राज्यपालांच्या हाताखाली काम करणारे कनिष्ठ सैनिक हे करतील.’ ” अहाबाने विचारले, “आणि युद्धाची सुरुवात कोण करणार?” संदेष्ट्याने म्हटले, “सुरुवात तू करणार.”
Settings