Skip to content
1 योहान २:७-११

प्रेमाची आज्ञा

1 योहान २:७-११
७
प्रिय बंधूंनो, मी काही तुम्हाला नवीन आज्ञा लिहून देत आहे असे नाही, तर ही जुनीच आहे, जी सुरुवातीपासून दिलेली आहे. ही जुनी आज्ञा जो एक संदेश आहे तो तुम्ही ऐकलेला आहे,
८
तरी मी तुम्हास एक नवी आज्ञा लिहित आहे; तिचे सत्य त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दिसून येत आहे, कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आताच प्रज्वलित झाला आहे.
९
जर कोणी प्रकाशामध्ये आहे असा दावा करतो, परंतु आपल्या बंधू किंवा भगिनीचा द्वेष करतो तर तो अजूनही अंधकारातच आहे.
१०
जो कोणी आपल्या बंधू आणि भगिनीवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये असे काहीच नाही की ज्यामुळे ते अडखळतील.
११
परंतु जर कोणी आपल्या बंधू व भगिनीचा द्वेष करतो, तो अंधकारात राहतो आणि अंधारात चालतो. ते कुठे जातात हे त्यांना कळत नाही, कारण अंधाराने त्यांना आंधळे केले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options