1 इतिहास २३:२४-२७
२४
लेव्याच्या शिरगणतीमधील सर्व लेवी पुरुष—ज्या कुटुंब प्रमुखांची नावे समाविष्ट केली व त्यांची नावनोंदणी झाली, जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते, त्या सर्वांना याहवेहच्या मंदिरात सेवाकार्य दिले गेले.
२५
कारण दावीद म्हणाला होता, “इस्राएलाच्या याहवेह परमेश्वराने आम्हाला विश्रांती दिली आहे आणि यरुशलेमात निरंतर निवास करण्यास ते आले आहेत.
२६
म्हणून लेव्यांना निवासमंडप व इतर सर्व सेवा साधने एका जागेवरून दुसर्या जागी नेण्याची गरज राहणार नाही.”
२७
दावीदाच्या शेवटच्या सूचनेनुसार, वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लेवींची शिरगणती केली गेली.
Settings