११
पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या रहिवाशांनी ऐकले,
१२
तेव्हा त्यांचे सर्व शूर पुरुष रणांगणावर गेले व त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह याबेश येथे परत आणले. त्यांच्या अस्थी याबेश येथील एला झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.