स्तोत्रसंहिता३३
Listen to this chapter
0:00
0:00
आनंदाने स्तुती करण्याचे आवाहन
१
अहो नीतिमान लोकांनो, याहवेहमध्ये आनंद करा, कारण त्यांची प्रशंसा करणे सरळ माणसांना शोभादायक आहे.
२
वीणेवर याहवेहस धन्यवाद द्या; दशतंतू वाद्यावर त्यांचे संगीत गा.
३
त्यांच्यापुढे नवीन गीत गा; जयघोष करीत कुशलतेने वाद्ये वाजवा.
देवाच्या वचनाचे नीतिमत्त्व व सत्य
४
कारण याहवेहची वचने सरळ आहेत; आपल्या प्रत्येक कार्यात ते विश्वासयोग्य आहेत.
५
याहवेहला नीती आणि न्याय प्रिय आहेत, पृथ्वी त्यांच्या वात्सल्यमय प्रीतीने भरून गेली आहे.
सार्वभौम सृष्टिकर्ता देव
६
याहवेहच्या शब्दाने स्वर्ग अस्तित्वात आला; त्यांच्या मुख श्वासाने सर्व नक्षत्रे निर्माण झाली.
७
बुधल्यात पाणी भरावे, त्याप्रमाणे ते महासागराचे पाणी एकवटीत आहेत; त्यांच्या भांडारात सागरांचा साठा करीत आहेत.
८
संपूर्ण पृथ्वीने याहवेहचे भय धरावे; जगातील सर्व लोकांनी त्यांची आदरयुक्त भीती बाळगावी.
९
कारण त्यांनी केवळ शब्द उच्चारला आणि जगाची उत्पत्ती झाली, त्यांच्या आज्ञेने ते स्थिर झाले.
परमेश्वराचा सार्वकालिक संकल्प
१०
याहवेह राष्ट्रांच्या योजना व्यर्थ करतात; ते लोकांचे बेत निष्फळ करतात.
११
परंतु याहवेहच्या योजना सर्वकाळ स्थिर राहतात; त्यांच्या हृदयातील हेतू प्रत्येक पिढीसाठी कायमस्वरूपी असतात.
परमेश्वर आपल्या लोकांवर लक्ष ठेवतो
१२
ज्या राष्ट्रांचे परमेश्वर याहवेह आहेत, ज्या लोकांना त्यांनी स्वतःच्या वतनाकरिता निवडले ते धन्य.
१३
याहवेह स्वर्गातून खाली पाहतात आणि संपूर्ण मानवजातीला न्याहाळतात;
१४
ते आपल्या निवासस्थानामधून पृथ्वीवरील सर्व लोकांना पारखतात.
१५
त्यांनीच सर्वांची हृदये घडविली, तेच प्रत्येकाचे कार्य पारखतात.
१६
कोणताही राजा सैन्याच्या संख्येने विजय प्राप्त करतो असे नाही; कोणताही योद्धा आपल्या महान शक्तीने स्वतःचा बचाव करू शकतो असेही नाही.
१७
युद्धात विजय प्राप्तीसाठी घोड्यावर भिस्त ठेवणे निरर्थक आहे; घोडा बळकट असेल पण तो कोणाचा बचाव करू शकत नाही.
१८
परंतु जे त्यांचे भय धरतात, ज्यांची आशा त्यांच्या अक्षय प्रीतीवर आहे, त्यांच्यावर याहवेहची दृष्टी असते. ते त्यांना मृत्यूपासून सोडवून, दुष्काळात त्यांच्या प्राणाचे रक्षण करतात.
विश्वास व विनंतीची अंतिम घोषणा
२०
आम्ही याहवेहची वाट पाहत आहोत; केवळ तेच आमचे साहाय्य आणि ढाल आहेत.
२१
त्यांच्यामध्येच आमच्या हृदयात आनंद आहे, कारण त्यांच्या पवित्र नावावर आमचा विश्वास आहे.
२२
याहवेह तुमची अक्षय प्रीती आमच्या सभोवती असू द्या, कारण आमच्या आशेचे स्थान केवळ तुम्हीच आहात.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note