स्तोत्रसंहिता१४
Listen to this chapter
0:00
0:00
मूर्खाचा देवाचा नकार
१
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.
२
मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.
३
प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.
अनीती करणाऱ्यांवरील न्याय
४
दुष्कृत्य करणार्यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.
५
पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत, कारण परमेश्वर नीतिमानांच्या पक्षाचे आहेत.
६
दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता, परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात.
इस्राएलच्या तारणासाठी प्रार्थना
७
अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!
Settings
Reading style
Typeface
Font size px
Reading width chars
Options
Study note