स्तोत्रसंहिता १११:५-९
५
जे त्यांचे भय धरतात त्यांना ते अन्नाचा पुरवठा करतात; ते आपला करार नेहमी स्मरणात ठेवतात.
६
त्यांच्या कृत्यांचे सामर्थ्य त्यांच्या लोकांना प्रकट होण्यास, त्यांनी अन्य राष्ट्रांची भूमी त्यांना वतनादाखल दिली.
७
त्यांच्या हाताने केलेली सर्व कृत्ये न्याय्य आणि विश्वसनीय असतात; त्यांचे सर्व नियम विश्वासयोग्य असतात.
८
ते नियम सदासर्वकाळ अटळ आहेत, सत्य आणि सात्विकतेला अनुसरून तयार केलेले आहेत.
९
त्यांनी आपल्या लोकांना मुक्तता दिली आहे; त्यांनी आपला करार अनंतकाळासाठी स्थापित केला आहे— त्यांचे नाव पवित्र व भयावह आहे.
Settings