Skip to content
स्तोत्रसंहिता १०७:३५-४१

स्तोत्रसंहिता १०७:३५-४१

३५
पुन्हा ते वाळवंटांचे जलमय भूमीत, आणि शुष्क भूमीचे वाहत्या झर्‍यात रूपांतर करतात.
३६
तिथे वस्ती करण्यासाठी त्यांनी भुकेल्यांस आणले, व त्या लोकांनी तिथे वस्ती करून शहरे स्थापित केली.
३७
त्या ठिकाणी त्यांनी शेती केली व आपले द्राक्षमळे लावले, ज्यांची त्यांना भरघोस पिके मिळाली.
३८
त्यांनी त्यांना मोठा आशीर्वाद दिला, त्यांची संख्या अनेक पटीने वाढली, तिथे त्यांच्या गुरांचीही हानी होऊ दिली नाही.
३९
परंतु मग त्यांची संख्या घटली, जुलूम, संकट आणि दुःख यामुळे ते लीन झाले.
४०
ते त्यांच्या सरदारांवर निंदा-वृष्टी करतात, त्यांना बिनवाटेच्या टाकाऊ प्रदेशातून भटकवितात.
४१
परंतु गरजवंतांची ते पीडेतून सुटका करतात, आणि त्यांच्या कुटुंबाची कळपासारखी भरभराट करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options