Skip to content
स्तोत्रसंहिता १०४:१९

स्तोत्रसंहिता १०४:१९

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १९ दाखवत आहे.
१६
याहवेहने लावलेल्या लबानोनाच्या गंधसरू वृक्षास भरपूर पाणी पुरवठा असतो.
१७
त्यावर पक्षी आपली घरटी करतात व करकोचा त्याचे घरटे देवदारू वृक्षावर बांधतो.
१८
उंच पर्वत रानबकर्‍यांचे निवासस्थान आहेत, खडकांमध्ये डोंगरी ससे सुरक्षित बिळे करतात.
१९
त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली, आणि सूर्यास कधी अस्त व्हावे हे ठाऊक आहे.
२०
ते अंधार पाठवितात आणि रात्र होते, तेव्हा वनचर भक्ष्यार्थ बाहेर पडतात.
२१
सिंह भक्ष्यासाठी गर्जना करतात, आणि त्यांचे अन्न परमेश्वराकडून अपेक्षितात.
२२
सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या गुहांमध्ये परत येऊन लपतात, व शांतपणे झोपतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options