Skip to content
गणना २२:२३-२७

गणना २२:२३-२७

२३
जेव्हा याहवेहचा दूत उपसलेली तलवार हातात घेऊन वाटेत उभा आहे असे गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाटेतून वळून शेतात गेली. बलामाने तिला मारून पुन्हा वाटेवर आणले.
२४
नंतर याहवेहचा दूत द्राक्षमळ्यांच्या मधील अरुंद वाटेवर उभा राहिला, त्याच्या दोन्ही बाजूंना भिंती होत्या.
२५
जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, ती भिंतीला घसटली व बलामाचा पाय भिंतीशी चेंगरला. म्हणून त्याने गाढवीला पुन्हा मारले.
२६
नंतर याहवेहचा दूत पुढे जाऊन जिथे उजवीकडे किंवा डावीकडे वळायला जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला.
२७
जेव्हा गाढवीने याहवेहच्या दूताला पाहिले, बलाम तिच्यावर बसलेला असतानाच ती त्याच्यासहच खाली बसली आणि तो रागावला व तिला काठीने मारले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options