गणना १८:२०
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २० दाखवत आहे.
१७
गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे.
१८
जसे ओवाळणीचा छातीचा भाग व उजवी मांडी तुझे आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे मांस सुद्धा तुझ्या वाट्याचे होईल.
१९
इस्राएली लोक याहवेहसाठी जी पवित्र अर्पणे आणतात, त्यातील जे काही बाजूला काढून ठेवले जाते, ते मी तुला आणि तुझ्या पुत्रांना व तुझ्या कन्यांना शाश्वत वाटा म्हणून देत आहे. हा याहवेहसमोर तुझ्यासाठी व तुझ्या संतानांसाठी सर्वकाळचा मिठाच्या करार आहे.
२०
याहवेहने अहरोनाला म्हटले, “त्यांच्या देशात तुला वतन असणार नाही किंवा तुला त्यांच्यात कोणताही वाटा असणार नाही; इस्राएलमध्ये मी तुझा वाटा व तुझे वतन आहे.”
२१
लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे.
२२
येथून पुढे इस्राएली लोकांनी सभामंडपाजवळ जाऊ नये, नाहीतर त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल व ते मरतील.
२३
लेवी लोक सभामंडपामध्ये सेवा करतील आणि त्याविरोधात केलेल्या अपराधाची जबाबदारी ते स्वतः वाहतील. येणार्या पिढ्यांपर्यंत हा सर्वकाळचा नियम असेल. इस्राएलमध्ये त्यांना वतन मिळणार नाही.
Settings