Skip to content
नहेम्याह ७:७३

नगरांमध्ये वस्ती

नहेम्याह ७:७३
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ७३ दाखवत आहे.
७०
त्यांच्यातील काही पुढार्‍यांनी कामासाठी देणग्या दिल्या. राज्यपालाने 1,000 दारिक सोने, धार्मिक विधींसाठी लागणारे 50 कटोरे, आणि याजकांसाठी पोशाखांचे 530 संच दिले.
७१
काही कुलप्रमुखांनी कामासाठी भांडारात 20,000 दारिक सोने, 2,200 मीना चांदी दिली.
७२
बाकीच्या लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 मीना चांदी आणि याजकांसाठी 67 झगे दिले.
७३
इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएली लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले. सातव्या महिन्यापर्यंत ते यरुशलेमला आपआपल्या नगरात स्थायिक झाले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options