Skip to content
लेवीय २६:२८

लेवीय २६:२८

आजूबाजूच्या संदर्भासह वचन २८ दाखवत आहे.
२५
माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल.
२६
मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत.
२७
“ ‘एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकणार नाही आणि माझ्याविरुद्ध वागाल,
२८
तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन.
२९
तुम्ही तुमच्या पुत्रांचे व तुमच्या कन्यांचे मांस खाल.
३०
तुमच्या उच्च स्थानांचा मी नाश करेन; तुमच्या धूपवेद्या मी मोडून टाकीन; तुमची प्रेते कुजण्यासाठी मी ती मूर्तीच्या समवेतच राहू देईन आणि मी तुमचा तिरस्कार करेन.
३१
तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options