यहेज्केल ३३:१
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १ दाखवत आहे.
१
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
२
“मानवपुत्रा, तुझ्या लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘जेव्हा मी एका देशावर तलवार आणतो, तेव्हा त्या देशाचे लोक त्यांच्या लोकांतील एकाची निवड करून त्याची पहारेकरी म्हणून नेमणूक करतात,
३
आणि ती तलवार देशावर येत आहे असे पाहताच लोकांना सावध करण्यासाठी तो कर्णा वाजवितो,
४
तेव्हा जर कोणी कर्ण्याचा आवाज ऐकूनही इशार्याकडे लक्ष देत नाही आणि तलवार येऊन त्यांचा जीव घेते, तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर असेल.
Settings