پرش به محتوا
निर्गम २८:३२

निर्गम २८:३२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३२ दाखवत आहे.
२९
“अहरोन जेव्हा पवित्रस्थानात जाईल, तेव्हा इस्राएलच्या पुत्रांची नावे असलेला निर्णयाचा ऊरपट एक नित्य स्मरण म्हणून आपल्या हृदयावर याहवेहसमोर घेऊन जाईल.
३०
जेव्हा तो याहवेहच्या उपस्थितीत जाईल, तेव्हा अहरोनाने उरीम व थुम्मीम सुद्धा ऊरपटात, आपल्या हृदयावर ठेवून जावे. अशाप्रकारे अहरोनाने नित्यनेमाने इस्राएली लोकांसाठी निर्णय घेणार्‍या वस्तू आपल्या हृदयावर वाहत याहवेहसमोर यावे.”
३१
“एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनवावा.
३२
डोके जाईल असे त्याला मधोमध उघडे ठेवावे. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे विणलेला गोट असावा.
३३
त्या झग्याच्या खालच्या घेर्‍यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची डाळिंबे व त्यामध्ये सोन्याच्या घंट्या बनवाव्या.
३४
सोन्याच्या घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने झग्याच्या घेराला लावावे.
३५
अहरोनाने तो झगा सेवा करीत असताना घालावा. जेव्हा तो याहवेहसमोर पवित्रस्थानात जातो व बाहेर येतो त्यावेळी घंट्यांचा आवाज ऐकू येईल, म्हणजे तो मरणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options