स्तोत्रसंहिता१०
Listen to this chapter
0:00
0:00
१
याहवेह, तुम्ही दूर का उभे आहात? संकटसमयी तुम्ही स्वतःला का लपविता?
२
दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात.
३
कारण हा दुष्ट मनुष्य स्वतःच्या दुष्ट वासनांची बढाई मारतो; तो लोभी लोकांना आशीर्वाद देतो व याहवेहची निंदा करतो.
४
दुष्ट त्याच्या गर्विष्ठपणामुळे परमेश्वराचा घेतच नाहीत; परमेश्वराचा विचारही त्याच्या मनात येत नाही.
५
दुष्टाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळते; तुमच्या नियमांचा तो तिरस्कार करतो. त्याच्या विरोधकांकडे तो तुच्छतेने बघतो.
६
तो स्वतःशीच म्हणतो, “मला कधीही काही हलवू शकणार नाही.” “मला कोणीही काही इजा करणार नाही,” अशी फुशारकी तो मारतो.
७
लबाडी व धमक्यांनी त्याचे मुख भरलेले आहे; त्याच्या जिभेखाली उपद्रव आणि दुष्टता आहे.
८
गावात तो दबा धरून बसतो; गुप्तस्थळी तो निर्दोषाचे रक्त पाडतो. त्याची नजर असहाय्याची शिकार करण्यासाठी टपलेली असते;
९
तो सिंहासारखा दबा धरून बसतो; तो लाचार लोकांना पकडण्याच्या प्रतिक्षेत असतो; तो दीनांना पकडून आपल्या जाळ्यात ओढत नेतो.
१०
बळी पडलेले लोक त्याच्या प्रबळ शक्तीखाली दडपले जातात, त्याच्या प्रहारांनी चिरडले जातात.
११
तो स्वतःशी बोलतो, “परमेश्वराच्या लक्षात हे कधीही येणार नाही, त्यांनी आपले मुख लपविले आहे, ते हे पाहात नाहीत.”
१२
याहवेह उठा, परमेश्वरा, आपला हात उगारा! पीडितांना विसरू नका.
१३
परमेश्वराला दुष्ट तुच्छ का लेखतो? “परमेश्वर आपल्या दुष्कृत्यांचा झाडा कधीच घेणार नाही,” असे तो आपल्या स्वतःशी का म्हणतो?
१४
परंतु परमेश्वरा, तुम्ही पीडितांच्या यातना पाहता; तुम्ही त्यांची संकटे लक्षात घेऊन आपल्या नियंत्रणात घ्या. ते पीडित स्वतःला तुमच्या स्वाधीन करीत आहेत; कारण तुम्ही पितृहीनांचे साहाय्यकर्ता आहात.
१५
त्या दुष्टाचे भुजबळ मोडून टाका; त्याच्या दुष्टपणाचा असा हिशोब घ्या, की त्याची दुष्टता शोधून सापडणार नाही.
१६
याहवेह हे सर्वकाळचे राजा आहेत; त्यांच्या राज्यातून इतर राष्ट्रे नाहीशी झाली आहेत.
१७
याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा.
१८
गांजलेले व अनाथांचे रक्षण करा, म्हणजे मर्त्य मानवाची त्यांना पुन्हा कधीही दहशत वाटणार नाही.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Options
Study Note